क्रीडा क्षेत्राला उत्कृष्ट पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील – मुख्यमंत्री

मुंबई –  खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन क्रीडा क्षेत्राला उत्कृष्ट पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असून क्रीडा संघटनांचाही प्राधान्याने उत्कृष्ट खेळाडू निर्माण करण्याचा दृष्टिकोन असावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाणेफेक करुन शिवाजी पार्क जिमखानातर्फे (एसपीजी) शिवाजी पार्क (दादर) येथे आयोजित स्व.विजय मांजरेकर- रमाकांत देसाई टी-20 क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य सामन्याचा प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.  खेळ देखील महत्वपूर्ण करीअर संधी आहे, असे सांगून मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले की, आपल्या देशात 10 वी, 12 वी पर्यंत मुलांना खेळाला पालकांकडून परवानगी दिली जाते. पुढे खेळामध्ये आयुष्य घडविण्यासाठी संधी नसल्याच्या समजातून पालक मुलांना केवळ अभ्यासात गुंतवतात. हे चित्र बदलण्यासाठी शासनाकडूनही खेळाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यासाठी शासनाने अनेक सोयी सुविधा पुरविल्या आहेत. मात्र अजून खूप काही करण्याची गरज आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, खेळाला महत्त्व प्राप्त करुन देण्यासाठी राज्यातील बालेवाडी तसेच अन्य क्रीडा संकूल आणि खेळ सुविधांचा कार्यक्षम उपयोग व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. क्रीडा संघटनांनीही केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न बाळगता खेळ आणि खेळाडूंना सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)