क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी मतदानासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे- पंतप्रधान

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीला एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान व्हावे यासाठी कंबर कसली आहे.

देशातील सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क पार पडावा यासाठी मोदींनी महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली,अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवाग आणि व्ही.व्ही. एस.लक्ष्मण यांच्यासह अनेक, क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांना आवाहन करावे, असा आग्रह मोदींनी धरला आहे. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर ट्विट देखील केलं आहे.

लोकसभा निवडणुकींच्या ५४३ जागांसाठी देशभरात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान मतदान होईल आणि २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. तसेच या निवडणुकीत महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)