क्रीडाविषयक उपक्रमांच्या आयोजनासाठी शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

मुंबई  : क्रीडा विभागामार्फत क्रीडा व युवक सेवा अंतर्गत कार्य करणाऱ्या संस्थांना क्रीडा विषयक व युवक कल्याण विषयक उपक्रम आयोजित करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शासनाच्या वतीने जिल्हा स्तरावर विविध योजनांची तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये क्रीडांगण विकास अनुदान योजना, व्यायाम शाळा विकास अनुदान योजना यामध्ये कार्य करणाऱ्या स्वयंसेवी युवक मंडळ संस्थांना आर्थिक सहाय्य अशा विविध योजनांचा समावेश आहे. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
योजनांच्या अंमलबजावणीकरिता ज्या शैक्षणिक संस्था, क्रीडा मंडळे, महिला मंडळे, शासकीय संस्था, स्वायत्त संस्था यांना अर्ज सादर करावयाचा असेल किंवा अनुदानासंबंधी अधिक माहिती घ्यावयाची असेल त्यांनी मुंबई उपनगर जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालय, आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई  या ठिकाणी  येथे संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)