क्रीडादिनानिमित्त क्रीडा गौरव पुरस्कार प्रदान

नगर, (प्रतिनिधी) – क्रीडा भारती, नगर शाखेतर्फे मेजर ध्यानचंद जन्मदिवस व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ज्युदो खेळाडू आदित्य धोपावकर व ऍथलेटिक्‍स खेळाडू ऐश्‍वर्या शिंदे यांना क्रीडा गौरव पुरस्कार ज्येष्ठ क्रीडाशिक्षक शंकरराव बारसे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.

सारडा कॉलेजच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित कार्यक्रमाला हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, मानद सचिव सुनील रामदासी, कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा, क्रीडा भारतीचे जिल्हामंत्री अनंत देसाई, डॉ. अमोल खांदवे, जिल्हा भारतीचे शहराध्यक्ष निर्मल थोरात, शहर मंत्री अमोल धोपावकर, भारत सरकारचे सायकल कोच सुमेरसिंग, रजिस्ट्रार अशोक असेरी, अभिजित लुणिया, आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. अमोल खांदवे म्हणाले, “”खेळण्यापूर्वी शरीर वॉर्मअप करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते व शरीर खेळ खेळण्यास तयार होते. व्यायाम करताना किंवा खेळताना कोणतीही क्रिया पटकन करू नका. मैदानावर किंवा जिममध्ये व्यायाम करताना तो समतोलपणे करावा. खेळ खेळताना शरीर, मन यांचे संतुलन घालून खेळलात तर तुम्ही जिंकण्यात पूर्णपणे यशस्वी व्हाल. क्रीडा मानसशास्त्र हा खेळाडूंच्या क्षमता वाढवण्यात महत्त्वाचा घटक आहे. खेळाडूंनी त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

शंकरराव बारशे, सुनील रामदासी, प्रा. शिरीष मोडक, ब्रिजलाल सारडा यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन कीर्ती धोपावकर, मनीषा पुंडे यांनी केले. रामदास ढमाले यांनी आभार मानले. रवी पंतम, श्रीकांत निंबाळकर, स्नेहा खिस्ती, किरण पवार, आशुतोष कुकडे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले. यावेळी संजय धोपावकर, पद्मजा धोपावकर, सविता शिंदे, पांडुरंग आतकर, सिद्धार्थ सारडा, अनिल रामदासी व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)