क्रिश 4 रखडणार…

हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला सुपर हिरो म्हणून क्रिश जरी विख्यात झाला असला, तरी “क्रिश-4′ समोरील अडचणी दूर करण्यास तो देखील असमर्थ ठरतो आहे. प्रेक्षकांना या सिनेमासाठी आणखी बरीच वाट बघायला लागणार आहे. “क्रिश 4′ काहीही झाले तरी 2020 मध्ये रिलीज होऊ शकणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

यावर्षी जानेवारीमध्ये जेंव्हा हृतिकचा 44 वा वाढदिवस साजरा झाला तेंव्हा राकेश रोशन यांनी “क्रिश 4′ ची घोषणा करून त्याला वाढदिवसाची भेट दिली होती. पण अजून या सिनेमाची स्क्रीप्ट लिहीण्याचेच काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष प्रॉडक्‍शनला कधी सुरुवात होईल, ते राकेश रोशन नंतर जाहीर करणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावर्षाच्या अखेरीपर्यंत हृतिक रोशन टायगर श्रॉफ बरोबरचा यशराज बॅनरचा सिनेमा पूर्ण करणार आहे. त्यानंतरच तो “क्रिश- 4′ च्या कामाला सुरूवात करू शकेल. यामधेय्‌ स्पेशल इफेक्‍टस भरपूर असणार आहेत. म्हणजे हा सिनेमा रिलीज व्हायला 2021 पण उजाडू शकते. त्यातच असेही समजले आहे की “क्रिश -4′ हा “बाहुबली’प्रमाणे एकावेळी दोन भागात केला जाणार आहे. तसे असेल तर “क्रिश 4′ आणि “क्रिश 5’ची स्क्रीप्ट एकाचवेळी लिहीली जात असणार, हे उघड आहे. एकाचवेळी तयार करून दुसरा भाग काही कालावधीनंतर रिलीज केला जाणार अशी तयारी असू शकतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)