“क्रिश-4’साठी ऋतिक रोशनचा “सुपरहीरो’ला नकार

बॉलीवूडमधील सेक्‍सी आणि ऍक्‍शन हीरो अर्थात ऋतिक रोशन लवकर त्याच्या आगामी “सुपर 30′ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याचा लुक एकदम हटके असणार आहे. यात तो गणिततज्ज्ञ आनंद कुमार यांची भूमिका साकारणार आहे. तसेच ऋतिक खूपच कमी चित्रपट साईन करतो. त्यात त्याने आता एक बिग बजेट चित्रपटाची ऑफर नाकारल्याचे समजते.

वरुण धवनचा भाउ आणि डेविड धवनचा मुलगा म्हणजे चित्रपट निर्माता रोहित धवन एक चित्रपट बनविण्याच्या तयारीत आहे. हा चित्रपट बिग बजेटचा असून एक “सुपरहीरो’ चित्रपट आहे. “क्रिश’ सिरीजमध्ये ऋतिकला त्याने प्रत्येकवेळी पसंती दिली आहे. त्यामुळे “सुपरहीरो’साठीही रोहितने ऋतिकला ऑफर दिली होती. मात्र, ही ऑफर त्याने नाकारली आहे.

दरम्यान, ऋतिक आणि राकेश रोशन यांनी आपल्या आगामी “क्रिश-4’चे काम सुरू केले आहे. रोहित धवनच्या सुपरहीरोबाबत सांगायचे म्हटल्यास अद्याप त्याची स्क्रिप्टही तयार नाही. हा चित्रपट क्रिश सीरिजपेक्षा वेगळा असून ऋतिकने नकार कळविल्यानंतर रोहित आता नवीन सुपर ऍक्‍टरच्या शोधात आहे. या चित्रपटासाठी रोहित खूपच उत्सुक असनू हा चित्रपट साजिद नाडियाडवाला प्रोड्यूस करणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)