क्रिडा प्रबोधिनी, एसएनबीपी ऍकॅडमी, मध्यप्रदेश हॉकी असोसिएशन, जय भारत हॉकी संघ उपांत्य फेरीत

तिसरी एसएनबीपी ऑल इंडिया हॉकी स्पर्धा 

पुणे – पुण्याच्या क्रिडा प्रबोधिनी, आयोजक एसएनबीपी ऍकॅडमी यांच्यासह मध्यप्रदेश हॉकी असोसिएशन आणि हरयाणाच्या जय भारत हॉकी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून तिसऱ्या एसएनबीपी ऑल इंडिया हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडाक्‍यात प्रवेश केला आहे.

श्री शिवछत्रपती स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्‍स्‌ म्हाळूंगे-बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात एसएनबीपी ऍकॅडमीने हॉकी नाशिक संघाचा 11-0 असा सहज आणि एकतर्फी पराभव करून आगेकूच केली. यामध्ये एसएनबीपीच्या अभिषेक माने याने 3 गोल, अल्फाझ सय्यद शादाब मोहम्मद यांनी प्रत्येकी दोन गोल, शुभम लाहोर्या, अजय गोटे, नरेश चाटोळे व अभिषेक खालगे यांनी प्रत्येकी एकेक गोल करून संघाला सहज विजय मिळवून दिला.

पुण्याच्या क्रिडा प्रबोधिनी संघाने स्पोर्टस्‌ ऍथॉरीटी ऑफ गुजरात संघाचा 10-2 असा सहज पराभव करून उपांत्य फेरी गाठली. विजयी संघाकडून प्रथमेश हजारे याने तीन गोल केले. तर धैर्यशील जाधव, आदित्य लालगे, संतोष भोसले, सोहम काशिद, प्रसाद शेंडगे, अक्षय शेंडगे व मधुर कारणे यांनी प्रत्येकी एकेक गोल करून संघाला सहज विजय मिळवून दिला.

चुरशीच्या झालेल्या सामन्यात मध्यप्रदेश हॉकी ऍकॅडमीने बिहारच्या आर्मी बॉईज स्पोर्टस्‌ कंपनी रेजीमेंटचा 3-2 असा निसटता विजय मिळवला. मध्यप्रदेशच्या अलि अहमद, प्रियो बात्रा व इन्गालेम्बा यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाला विजयी मार्ग दाखवला. तर बिहार कडून नवीन बुरा आणि सचिन डुंग डुंग यांनी प्रत्येकी एक गोल केला.
अंतिम उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात हरयाणाच्या जय भारत हॉकी संघाने आपली विजयी घौडदौड कायम ठेवताना अशिबाघ हॉकी ट्रेनिंग सेंटर संघाचा 5-1 असा पराभव करून विजयी आगेकूच नोंदवत उपान्त्य फेरी गाठली.

सविस्तर निकाल – उपांत्यपुर्व फेरी –
1) एसएनबीपी ऍकॅडमीः 11 (अल्फाझ सय्यद 4, 69 मि., शुभम लाहोर्या 21 मि., शादाब मोहम्मद 30, 39 मि., अभिषेक माने 53, 56, 58 मि., अजय गोटे 55 मि., नरेश चाटोळे 62 मि., अभिषेक खालगे 65 मि.) वि.वि. हॉकी नाशिकः 0; हाफ टाईमः 3-0;

2) क्रिडा प्रबोधिनीः 10 (धैर्यशील जाधव 8 मि., प्रथमेश हजारे 9, 10, 29 मि., आदित्य लालगे 12 मि., संतोष भोसले 26 मि., सोहम काशिद 44 मि., प्रसाद शेंडगे 53 मि., अक्षय शेंडगे 56 मि., मधुर कारणे 59 मि.) वि.वि. स्पोर्टस्‌ ऍथॉरीटी ऑफ गुजरातः 2 (गौरांग अम्बुळकर 50, 62 मि.); हाफ टाईमः 6-0;

3) मध्यप्रदेश हॉकी ऍकॅडमीः 3 (अलि अहमद 7 मि., प्रियो बात्रा 20 मि., इन्गालेम्बा 67 मि.) वि.वि. आर्मी बॉईज स्पोर्टस्‌ कंपनी रेजीमेंट, बिहारः 2 (नवीन बुरा 44 मि., सचिन डुंग डुंग 55 मि.); हाफ टाईमः 2-0;
4) जय भारत हॉकी, भिवानी, हरयाणाः 5 (आशिष 19, हरीष वरिष्ठ 31 मि., गोविंदा 46 मि., हरीश ज्युनिअर 59, 64 मि.) वि.वि. अशिबाघ हॉकी ट्रेनिंग सेंटरः 1 (नदीमुद्दीन 36 मि.); हाफ टाईमः 2-0;

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)