पिंपरी – आदिनाथ क्रिकेट क्‍लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 11 वर्षाखालील आदिनाथ चषक क्रिकेट स्पर्धेत दिवेकर क्रिकेट अकादमीने मुंबईचा अविनाश साळवी फाउंडेशनचा 43 धावांनी पराभव करीत विजेतपद पटकावले.

स्पर्धेत पुणे इन्स्टिट्यूट ऑफ क्रिकेट संघाने तृतीय क्रमांक तर रायसिंगस्टार क्रिकेट क्‍लबने चतुर्थ क्रमांक पटकविला. अण्णासाहेब मगर स्टेडियम नेहरूनगर येथील मैदानावर अंतिम सामना पार पडला. स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ क्रीडा अधिकारी रजाक पानसरे, संतोष लांडगे, विवेक दरेकर, संजय लांडे, चेतन जाधव, ऍड. संजय जगदाळे, सुनील दिवेकर यांच्या उपस्थित पार पडला.

नाणेफेक जिंकून दिवेकर संघांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली. हर्ष बारमुख याने अर्ध शतक ठोकत 52 धावा केल्या. त्याला चंद्रास 23 व स्पंदन 19 धावा करीत निर्धारित 20 षटकात 5 बाद 132 केल्या. साळवी संघाकडून अभिज्ञान व आदित्य याने प्रत्येकी एक गडी बाद केले. 152 धावांचा पाठलाग करताना साळवी संघास फक्‍त 89 धावा केल्या. अभिज्ञान कुंडू ने एकाएकी लढत देत सर्वाधिक 33 धाव केल्या. विजयी संघाकडून हर्ष बारमुख ने 3 गडी बाद केले. उत्कृष्ट फलंदाज स्पर्धेत एकमेव शतक ठोकत 306 धावा करणारा अविनाश साळवी फाउंडेशनचा अभिज्ञान कुंडू, उत्कृष्ट गोलंदाज गौरविण्यात आले. तर “मॅन ऑफ दि सिरीज’ हर्ष बारमुख याने पटकविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)