क्रिकेट स्पर्धा: युनायटेड क्रिकेट क्‍लबचा सहज विजय

पीवायसी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धा

पुणे: युनायटेड क्रिकेट क्‍लब संघाने डेक्कन जिमखाना संघाचा सहज पराभव करताना येथे सुरु असलेल्या पीवायसी हिंदु जिमखाना क्‍लब यांच्या तर्फे पीवायसी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकुच नोंदवली आहे.

-Ads-

डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात डेक्कन जिमखाना संघाला घरच्या मैदानावर हार पत्करावी लागली. युनायटेड क्रिकेट क्‍लब संघाने प्रथम खेळताना ओमकार काळेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 45 षटकात 8 बाद 172 धावा केल्या. यात श्रीयश यादवने 25 व परम अभ्युदयने 27 धावा करून ओमकारला सुरेख साथ दिली. 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अदित्य श्रीकृष्णनच्या अचूक व आक्रमक गोलंदाजीपुढे डेक्कन जिमखाना संघ 45 षटकात 9 बाद 120 धावांत गारद झाला. अथर्व सनसच्या 45 धावा संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत. 28 धावांत 4 गडी बाद करणारा अदित्य श्रीकृष्णन सामनावीर ठरला.

सविस्तर निकाल- साखळी फेरी

युनायटेड क्रिकेट क्‍लब- 45 षटकांत 8 बाद 172 (ओमकार काळे 54, श्रीयश यादव 25, परम अभ्युदय 27, शिव हरपळे 17, रणवीर सिंग चौहाण 13, देवराज बेद्रे 2-20, अथर्व सनस 2-20, वेदांत सनस 2-28, सत्यम शिंदे 2-15) वि.वि डेक्कन जिमखाना- 45 षटकांत 9 बाद 120 (अथर्व सनस 45, अदित्य श्रीकृष्णन 4-28, यश जमगे 2-18, शिव हरपळे 2-18, माहिर रावळ 1-25). सामनावीर – अदित्य श्रीकृष्णन


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)