क्रिकेट मॅचवर बेटींग घेणारे अटक

क्रिकेट मॅचवर बेटींग घेणारे अटक
पुणे,दि.28- भारत-न्युझिलंड क्रिकेट मॅचवर बेटींग घेणाऱ्यास ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही कारवाई लोणावळा येथील हॉटेल रॉयल दरबार येथे करण्यात आली.
भाविन सामजी आनम(38,रा.मुलूंड) असे अटक आरोपीचे नाव आहे. ग्रामीण पोलीसांना एकदिवशीय क्रिकेट सामन्यावर मोबाईल मार्फत बेटींग लावले जात असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार हॉटेल दरबारवर छापा टाकून कारवाई करण्यात आली. यावेळी भावेन हा ऑनलाईन पध्दतीने बेटींग लावताना आढळला. त्याच्याकडून मोबाईल व एक रजिस्टर असा 14 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. त्याने दया भानुशाली(पुणे),चेतन प्रभुदास झाला(46,रा.नवी मुंबई), निरव रमानी(मुलूंड), मॉन्टु जैन(मुलूंड), शशी गुलाब आजवानी(मुंबई) यांना ऑनलाईन पध्दतीने एक लाख रुपये किंमतीचा सट्टा लावला होता. या सर्वांविरुद्द लोणावळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधिक्षक संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस उपनिरीक्षक जिवन राजगुरु, महेश मुंडे,सहायक फौजदार विजय पाटील, सुनिल बांदल, दिलीप जाधवर, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश वाघमारे, मोरेश्‍वर इनामदार, दयांनद लिमण, पोलीस नाईक गणेश महाडीक, चंद्रकांत जाधव, ज्ञानदेव क्षीरसागर, विशाल साळुंखे आणी अक्षय नवले

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)