क्रिकेट “बेट’ हारल्याने स्वत:च्या खुनाचा बनाव – पोलीसांनी केली अटक

ढाका (बांगला देश) – क्रिकेट “बेट’ हारल्याने स्वत:च्या खुनाचा बनाव करणाऱ्याला बांगला देश पोलीसांनी अटक केल्याची माहिती ढाक्‍याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी कामरूझमन यांनी दिली आहे. भारत-बांगला देश सामन्याची बेट हारल्यामुळे सुमारे दीड लाख टका, म्हणजे 1800 डॉलर्सची रक्कम द्यावी लागू नये म्हणून आदेल शिकदर नावाच्या युवकाने स्वत:च्या खुनाचा बनाव करून तो व्हिडियो सोशल मीडियावर टाकला होता. हा व्हिडियो काही दिवसातच 10,000 वेळा शेयर करण्यात आला.

भारत-बांगला देश यांच्यातील श्रीलंकेत झालेल्या अंतिम सामन्यात आदेल शिकदरने बांगला देश जिंकणार म्हणून दीड लाख ट्‌क्‍यांची बेट लावली होती. शेवटच्या चेंडूवर दिनेश कार्तिकने मारलेल्या षटकारामुळे भारताने हा अशक्‍यप्राय विजय मिळवला होता. त्यानंतर आदेल शिकदरने एक मेकपमन व व्हिडियोग्राफर यांच्या मदतीने स्वत:चा गळा कापून खून झाल्याचा व्हिडियो तयार केला. आणि ज्याच्याशी पैज लावली होती त्याला निनावी पाठवला आणि सोशल मीडियावर टाकला.

आदेल शिकदरचा खून झाल्याचे समजल्यावर आणि त्याचा मृतदेहही न मिळाल्याने घाबरलेल्या त्याच्या आईवडिलांनी पोलीसात तक्रार केली. लाल फ्रूट सायरप वापरून रक्ताचा भास करणारा मेकप आर्टिस्ट पोलीसांच्या हाती लागताच खुनाचा बनाव उघड झाला. दुसऱ्या दिवशी आदेल शिकदरला अटक करण्यात आली. आदेल शिकदरने त्या अगोदरच्या सामन्यात बांगला देशाने श्रीलंकेवर विजय मिळवल्याने त्याच व्यक्तीकडून 40,000 टका जिंकले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)