क्रिकेट अ‍ॅकॅडमी लावण्यासाठी त्या मुलाने चक्क स्वतःच्याच अपहरणाचा रचला डाव

पुणे – सहकारनगर परिसरातील १४ वर्षांचा मुलगा एक जानेवारी रोजी  नेहमीप्रमाणे शिकवणी वर्गाला गेला. मात्र काही वेळाने मुलगा लवकर घरी परतला नाही. त्यानंतर त्या मुलाच्या वडिलांच्या फोनवर  ‘तुम्हारा बेटा चाहिये, तो विशाखापट्टणम आओ,’ असा इंग्रजीमध्ये मेसेज आला. यामुळे कुटुंबीय घाबरले आणि त्यांनी तत्काळ सहकारनगर पोलिस ठाण्यात अपहरण झाल्याची तक्रार दिली.

सहकारनगरचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शेवाळे यांनी लगेचच तपासाची सूत्रे फिरवली. आणि विशाखापट्टणम येथील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मुलाचे फोटो व माहिती पाठवली. त्यानंतर मुलाचा तपास लागल्याचे समजले असता, सहकारनगर पोलिस ठाण्याचे एक पथक त्याच्या शोधासाठी विशाखापट्टणमकडे रवाना करण्यात आलं.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विशाखापट्टणम पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले. त्या वेळी त्याला विश्‍वासात घेऊन चौकशी केली.तेव्हा त्याने वडिलांनी क्रिकेट अ‍ॅकॅडमी लावली नाही, म्हणून शिकवणी वर्गाला जातो म्हणून निघून आल्याचे सांगितले. सोबत बॅग व त्याच्या आईचा मोबाइल घेऊन तो बाहेर पडला. त्यानंतर तो तेथून बालाजीनगर येथील बस स्टॉपवरून पुणे स्टेशनला गेला. रेल्वेने विशाखापट्टणम येथे गेला.

त्यानंतर रस्त्यात भीती वाटू लागल्यामुळे वडिलांच्या मोबाइलवर अपहरण झाल्याचा मेसेज केल्याचे त्याने सांगितले. या मुलामुळे दोन राज्याचे पोलिस चांगलेच कामाला लागले गेले. पुण्यात दोन महिन्यांपूर्वी सुध्या सिंहगड रोड परिसरात एका मुलाने घरी जाण्यास उशीर झाल्यामुळे त्याचे अपहरण केल्याचा खोटा बनाव रचला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)