क्राॅनी कॅपिटॅलिझममुळे अनुत्पादक मालमत्ता वाढत जाणार: अमित मित्रा 

कोलकाता: बॅंकांची अनुत्पादक मालमत्ता बरेच प्रयत्न करूनही वाढतच आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी बॅंक घोटाळे उजेडात येण्याची शक्‍यता असल्याचे प. बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी म्हटले आहे. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, 2014 मध्ये अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण केवळ 4.4 टक्‍के होते. ते आता 11.6 टक्‍क्‍यांवर गेले आहे. दरम्यानच्या काळात बॅंकातील अनेक घोटाळे बाहेर येत आहेत. त्याचबरोबर काही बॅंकांवर आणि बॅंकांच्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जात आहे. दरम्यानच्या काळात बॅंकांच्या नफ्याचे रूपांतर तोट्यात झाले आहे. त्याचबरोबर बॅंकांच्या कर्ज वितरण क्षमतेवर परिणाम झाला आहे. आता रियल इस्टेट क्षेत्राला बॅंकांपेक्षा बिगर बॅंकिंग वित्त संस्था जास्त कर्ज देत आहेत. त्याचे व्याज जास्त असते.
ते म्हणाले की, बऱ्याच बॅंकांनी ताळेबंद जाहीर केले आहेत. त्यावरून बॅंकांच्या परिस्थितीचा अंदाज येत आहे. आगामी काळातही एनपीए वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे घोटाळेही बाहेर येण्याची शक्‍यता आहे. बॅंकांनी याबाबतची माहिती अगोदरच द्यावी अन्यथा त्यांच्यावर कंपन्यांच्या प्रवर्तकावर ज्या प्रमाणे कारवाई केली जाते त्या प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असा इशारा अगोदरच अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. ते म्हणाले की, जवळ जवळ 11 सरकारी बॅंकांच्या कामकाजावर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे या बॅंकांकडून होणाऱ्या कर्ज पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे.
रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एनपीएतील रक्कम 10.25 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. हे क्रॉनी कॅपिटॅलिझमचे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे यात अनेक घोटाळे झाल्याची शक्‍यता आहे. काळाच्या ओघात हे घोटाळे बाहेर येण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, बॅंकांकडून छोट्या उद्योगावर नेहमीच अन्याय होत आला आहे. छोटे उद्योग जास्त प्रमाणात रोजगार निर्माण करतात. मात्र, त्यांना कर्ज देण्यास बॅंका टाळाटाळ करतात. तर मोठ्या कंपन्यांच्या मागे लागून त्यांना कर्ज दिले जाते. मोठ्या उद्योगांना आणि छोट्या उद्योगांना द्यायच्या कर्जाचे प्रमाण ठरवून देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मोठ्या उद्योगापेक्षा छोट्या उद्योगाकडून कर्जाचा वापर अधिक जबाबदारी केला जातो, असा दावा मित्रा यांनी केला. त्याच्याकडून कर्ज परत करण्याचे प्रमाणही जास्त असल्याचे ते म्हणाले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)