क्राफ्ट प्रेमींसाठी संपूर्ण भारतातील विविध कला आणि हस्तकला पाहण्याची संधी  

दस्तकरी हाट प्रदर्शनी पुण्यात ! 

पुणे: पुण्यातील क्राफ्ट प्रेमींसाठी संपूर्ण भारतातील विविध कला आणि हस्तकला पाहण्याची संधी दस्तकरी हाट समिती पुन्हा एकदा घेऊन आली आहे. आपल्या मूळ संस्कृतीची अभिव्यक्ती असणारी संपूर्ण भारत भरातील कला, शिल्पकला आणि कपड्यांचे विविध संग्रह या प्रदर्शनीत पहावयास मिळतील. शतरंज वाईन अँड डाइन, १२०, एसबीआय ट्रेनिंग सेंटरच्या मागे, लेन न. ४ कोरेगाव पार्क, पुणे येथे  हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत हे खुले असेल.

-Ads-

दस्तकरी हाट एक उत्सवपूर्ण, रंगीत आणि विविध शिल्पकलांनी समृद्ध असे प्रदर्शन आहे. येथे संपूर्ण भारतातील हस्तकला, वत्त्रउद्योग आणि शिल्पकलेत पारंगत व्यक्ती त्यांचे कौशल्य प्रदर्शित करतात. लोककल्याणाच्या रोजगाराच्या संधी, कलाकृतींचे प्रदर्शन, खास सजावट आणि लोककलेच्या विविध कार्यक्रमांचे प्रदर्शन देखील येथे पहावयास मिळेल.

मधुबनी कला, लाकूड आणि वस्त्रे, गोंड कला, मण्यांपासून बनलेली ज्वेलरी,पश्चिम बंगालची कन्टा कढ़ाई , ब्लॉक प्रिंट, कढ़ाई आणि राजस्थानचे वीणकाम, मध्य प्रदेशातील चंदेरी आणि माहेश्वरी, बनारसी विव्ह्स, उत्तर प्रदेशातील चिकन एम्ब्रॅायडी, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील मातीची भांडी, पश्चिम बंगालमधील लिनन साड्या, ओरिसाचे चांदीचे दागिने आणि अन्य बऱ्याच प्रकारचे क्राफ्ट येथे पहावयास मिळेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)