क्राईम पेट्रोल पाहून ‘तिने’ घेतला गळफास

मेरठ :  उत्तरप्रदेशमधील एका आठ वर्षांच्या मुलीने मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘क्राईम पेट्रोल’ पाहून तिने हे कृत्य केल्याचं म्हटलं जात आहे. सिमरन असे मृत मुलीचे नाव आहे. सिमरन मित्रांसोबत खेळण्यासाठी शेजारी गेली होती. सिमरन आणि तिचे सुमारे मित्र-मैत्रिणी क्राईमवर आधारित टीव्ही शो ‘क्राईम पेट्रोल’ पाहत होते.

यानंतर सिमरनने एका सीनची नक्कल करण्यास सुरुवात केली. एक महिला गळफास घेत असल्याचा हा सीन होता. सिमरन बादलीवर उभी राहिली आणि ओढणीचा फास बनवला तर इतर मुलांनी तिची मदत केली. पण त्याचा परिणाम इतका भीषण असेल, ह्याची कल्पनाही त्या मुलांना नव्हती.

सिमरन बादलीवर उभी होती आणि तिच्या गळ्यात गुंडाळलेली ओढणी वर लावलेल्या लोखंडी रॉडला बांधली होती, असं पोलिसांनी सांगितलं. बादली घसरल्यानंतर, फास बसला.
संध्याकाळ झाली तरी सिमरन घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरु केला. रात्री उशिरा त्यांना या घटनेबाबत समजल्यानतंर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)