क्रांती रेडकरला जुळ्या मुली 

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर आई झाली असून तिने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. तिने या चिमुकल्यांना मुंबईतील सूर्या हॉस्पिटलमध्ये जन्म दिला. 2017 साली आयपीएस अधिकारी समीर वानखेडेशी क्रांती विवाहबंधनात अडकली होती.

या दोघांनीही अगदी साध्या आणि गुपचूप पद्धतीने लग्न केले होते. तिच्या घरी काही दिवसापूर्वीच डोहाळजेवणाचा कार्यक्रमही पार पडला होता. त्यावेळी या सोहळ्याचे फोटो क्रांतीने आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन शेअर केले होते. या फोटोंना अनेक चाहत्यांनी लाईक देत तिल्या शुभेच्छा दिल्या होत्या.

-Ads-

दरम्यान, क्रांतीला “जत्रा’ चित्रपटातील “कोंबडी पळाली…’ या गाण्यामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने ःऑन ड्युटी 24 तास’, “माझा नवरा तुझी बायको’, “नो एन्ट्री पुढे धोका आहे’ यासारख्या चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाची जादू दाखवली. तिने अभिनयासह दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून नवी इनिंग सुरू केली आहे. “काकण’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही तिने केले होते. क्रांतीच्या वैयक्तिक आयुष्याची या गोड बातमीमुळे नवी इनिंग सुरु होणार असून तिच्या घरात सध्या अतिशय आनंदाचे वातावरण आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)