क्रांती दिनी विद्यार्थी, शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन

पिंपरी – राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, प्रितम प्रकाश महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती दिनीा(दि.9) पाचवे विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. भोसरी, इंद्रायणीनगरमधील भगवान महावीर शिक्षण संस्थेच्या प्रितम प्रकाश महाविद्यालयाच्या सभागृहात संमेलन होणार आहे. या अंतर्गत सकाळी नऊ वाजता सहिष्णूता संदेश यात्रा काढण्यात येणार आहे.

ज्येष्ठ साहित्यक डॉ. अश्‍विनी धोंगडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटने होणार आहे. अध्यक्षस्थानी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे असणार आहेत. तर स्वागताध्यक्ष म्हणून भगवान महावीर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया यांची उपस्थिती असणार आहेत.
संमेलनात माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, प्रकाश रोकडे, प्रकाश जवळकर, विलास पगारिया, ऍड. भास्कर आव्हाड, हाजी अफजलभाई शेख हे उपस्थित राहणार आहेत. उद्‌घाटन प्रसंगी बंधुत्वाचे अनुबंध या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अशोककुमार पगारिया यांची संघर्षयात्रेची यशवंतगाथा या त्यांच्या आत्मचरित्रावर ज्येष्ठ कवी शंकर आथरे मुलाखत घेणार आहेत. संमेलनात काव्यक्रांती कवी संमेलन घेण्यात येणार असून त्याचे सुत्रसंचालन कवी चंद्रकांत धस करतील. यावेळी अरिहंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बजरंग कोरडे आणि ज्येष्ठ साहित्यक सुभाष आहेर यांना प्रबुद्ध साहित्यिक बाबा भारती साहित्यसेवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)