क्रांतीवीर नागनाथअण्णांच्या जेल उडीचा साताऱ्यात अमृत महोत्सव

सातारा, दि. 6 (प्रतिनिधी) –
भारतीय स्वातंत्र्याच्या 1942 च्या लढ्यातील थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी याची साताऱ्यातील जेलमधून अठरा फुटावरून मारलेली उडी इतिहास प्रसिध्द आहे. अण्णांचा हा भीमपराक्रम येत्या सोमवारी दि 10 रोजी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. वाळवा येथील पद्मभुषण क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी स्मारक समितीच्या वतीने साताऱ्यात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जेलफोड’चा अमृतमहोत्सव सोमवार, दि. 10 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील पद्मभूषण क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी समितीच्या वतीने साताऱ्यात भव्य कार्यक्रम होत आहे. सकाळी दहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सातारचे पालकमंत्री विजय शिवतारे तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आहेत.
भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईत क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवाडी यांनी आपले मोठे योगदान दिले आहे. 29 जुलै 1944 मध्ये त्यांना ब्रिटीशांनी पकडून इस्लापूर जेलमध्ये ठेवले होते. मात्र, येथूनही त्यांनी पलायनाचा बेत आखल्याची माहिती ब्रिटीशांना मिळाल्यानंतर त्यांना सातारा जेलमध्ये ठेवले होते. येथूनही त्यांनी पळून जाण्याचा बेत आखला आणि तो यशस्वीही केला. दि. 10 सप्टेंबर 1944 रोजी त्यांनी सातारा जेलच्या 18 फुट उंचीच्या तटावरुन उडी टाकून पलायन केले होते. अण्णांच्या या ‘जेलफोड’ला घटनेला सोमवार, दि. 10 सप्टेंबर रोजी 74 वर्षे पूर्ण होत असून त्यांच्या उडीचा अमृतमहोत्सव सुरु होत आहे. अण्णांच्या या जेलफोडचा प्रसंग भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीकारी घटना म्हणून उल्लेख केला आहे. भारतीय लढ्यात योगदान दिलेल्या या स्वातंत्र्यवीरांची आठवण म्हणून सातारा जिल्हा कारागृहाबाहेर एक क्रांतीस्तंभ उभा करण्यात आला आहे.
या घटनेची आठवण रहावी आणि भावी पिढीला त्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून वाळवा येथील पद्मभूषण क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी स्मारक समितीच्यावतीने सोमवार, दि. 10 रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रक वैभव नायकवडी आहेत. कारागृहाबाहेर असणाऱ्या स्मृतीस्तंभास अभिवादन केल्यानंतर हॉटेल ओम एक्‍झीक्‍युटीव्हच्या हॉलमध्ये मुख्य कार्यक्रम होणार आहे. यावेळी पालकमंत्री शिवतारे, सभापती रामराजे, सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक पकंज देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पद्मभूषण क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी स्मारक समितीने केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)