क्रांतिज्योती इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन

नान्नज – जामखेड तालुक्‍यातील जवळा येथील क्रांतिज्योती इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन झाले. विद्यार्थ्यांनी नृत्य व देशभक्‍तिपर गीते सादर केली. यावेळी पालक, जवळा ग्रामस्थ यांची संख्या लक्षणीय होती. पंचायत समिती सभापती सुभाष आव्हाड म्हणाले की, क्रांतिज्योती इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाने ग्रामीण परिसरात शिक्षणाची सोय केल्याने मुलींच्या शिक्षणाचा प्रश्‍न सुटला आहे. जवळा गावचे सरपंच अनिल पवार, उपसरपंच गौतम कोल्हे, ज्योती क्रांती मल्टिस्टेटचे संस्थापक अजिनाथ हजारे, सचिव किरण वर्पे, दशरथ हजारे, विष्णू हजारे, मारुती रोडे, डॉ. महादेव पवार, प्रदीप पाटील, भारत काकडे, राजेंद्र राऊत, दीपक वाळुंजकर, अभय नाळे यावेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)