क्रांतिकारकांच्या विचारांचा आदर्श घ्या

राजगुरूनगर-भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांच्या भावना तीव्र होत्या. त्यांच्या या देशभक्तीचा, त्यांच्या विचारांचा आदर्श आपण घ्यावा, असे आवाहन वंदे मातरम्‌ राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष संजय नहार यांनी केले.
हुतात्मा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू शहीद दिनानिमित्ताने येथील हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकात ध्वजारोहण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात नहार बोलत होते. यावेळी सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस उपाधीक्षक राम पठारे, हुतात्मा राजगुरू यांचे पुतणे सत्यशील राजगुरू, स्वातंत्रवीर सावरकर यांचे वंशज सात्यकी सावरकर, तहसीलदार विठ्ठल जोशी, हुतात्मा राजगुरू स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख, नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय डोळस, पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, नायब तहसीलदार राजेश कानसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे भास्कर क्षीरसागर, शिवसेना जिल्हा संघटक विजया शिंदे, भाजप प्रदेश सदस्या संगीता जगताप, भाजप महिला मोर्चा उपाध्यक्ष मोहिनी राक्षे, स्वच्छता दूत विक्रांत सिंग, उपनगराध्यक्षा वैशाली बारणे, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, सरकारी वकील रजनी नाईक, सामाजिक कायर्कर्त्या सुधा कोठारी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे, नगरसेवक संपदा सांडभोर, रेखा क्षोत्रीय, शंकर राक्षे, मनोहर सांडभोर, अंकुश राक्षे, बाल कलाकार दिनेश मेदगे, किरण मांजरे, उद्योजक राहुल गोरे, स्मारक समितीचे सचिव सुशील मांजरे, विश्वनाथ गोसावी, प्रकाश होळकर, राजू जाधव, संदीप वाळूंज, संजय नाईकरे, मधुकर गिलबिले, बाबासाहेब हजारे, यांचासह विविध संस्था, संघटनाचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक, थानिक नागरिक, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय नहार म्हणाले, थोर क्रांतिकारक हुतात्मा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचा शहीद दिन देशभर साजरा केला जातो. या क्रांतीवीरांनी देशासाठी शस्र हातात घेतले. आपण त्यांच्या विचारांचे शस्र हातात घेऊन त्यांच्या देशभर प्रचार केला पाहिजे. त्यांना कृतीतून श्रद्धांजली वाहिली पाहिजे. बलिदानाच्या त्यांच्या भावना लक्षात घेत देशासाठी योगदान दिले पाहिजे. त्यासाठी त्यांच्या विचारांना जोड दिली पाहिजे. स्वच्छता दूत विक्रांत सिंग यांनी केलेले मार्गदर्शन देशातील नागरिकांना प्रेरणा देणारे आहे. त्यांचे केंद्र व राज्य सरकारने स्वच्छता दूत म्हणून निवड करावी त्यांच्यासारख्या लढवय्या तरुणाची गरज आहे.
सात्यकी सावरकर म्हणाले, समाजात जातीपातीचे राजकारण सुरु असल्याने क्रांतिकारकांचे विचार मागे पडत आहेत. देशहितासाठी जातीपाती नष्ट करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित लढा दिला पाहिजे. विज्ञाननिष्ठा अंगीकारून अनिष्ठ प्रथांना आळा घातला पाहिजे. जातीपाती पाळणार नाही याची शपथ घेतली पाहिजे.
आयुष प्रसाद म्हणाले, व्यवस्थित विचार स्वच्छ विचार आणि विचारानंतर त्याची अंमलबजावणी करणे अत्यंत महत्वाचे आहे. समाजात फक्त विचार करणाऱ्यांची संख्या जास्त आहे आचरण करणारे फार कमी आहेत. आपला परिसर शहर स्वच्छ राखण्याची आपली जबाबदारी आहे. ती आपण पूर्ण केली पाहिजे.
स्वच्छता दूत विक्रांत सिंग म्हणाले, राज्यात स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यासाठी आमचे काम सुरु आहे. राजगुरुनगर येथील प्रत्येक नागरिकांनी “मी कचरा करणार नाही कोणाला कचरा करू देणार नाही,’ ही शपथ घेतली पाहिजे. हुतात्मा राजगुरू यांनी देशासाठी बलिदान दिले त्याचे विचार घेत आपण देशात स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न केले तरच ती त्यांना श्रद्धांजली ठरेल. यावेळी त्यांनी नागरिकांना मी कचरा करणार नाही करू देणार नाही याची शपथ दिली.
शहीद दिनानिमिताने हुतात्मा राजगुरू स्मारकात संजय नहार, आयुष प्रसाद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्मारकात राज्यभरातील मोठ्या संख्येने हुतात्मा राजगुरू प्रेमी, स्थानिक नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ गोसावी यांनी केले, स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख यांनी आभार मानले.

  • हुतात्मा राजगुरू यांचे राष्ट्रीय स्मारकाचे काम लवकर मार्गी लावण्यासाठी संबधित खात्याच्या मंत्र्यांची भेट घेऊन निधी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय स्मारकाला निधी मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. स्मारकासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. राजगुरुनगर शहराचे इतरही प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले आहे.
    -शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)