क्रयशक्ती वाढल्यामुळे एसीची मागणी वाढली

मुंबई – क्रयशक्तीत झालेली वाढ तसेच चांगल्या जीवनमानाच्या आकांक्षा यामुळे महानगरांव्यतिरिक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमधून वातानुकूलन यंत्राच्या मागणीतील वाढ ही तुलनेने अधिक असून आगामी पाच वर्षांत या बाजारवर्गात 30 टक्‍क्‍यांहून अधिक वृद्धीदर राहील, असे ब्लू स्टारचे सह-व्यवस्थापकीय संचालक बी. त्यागराजन यांनी सांगीतले. ब्लू स्टारने उच्च ऊर्जा कार्यक्षम 3 स्टार आणि 5 स्टार इन्व्हर्टर स्प्लिट एसी उपकरणाच्या 40 नवीन मॉडेल्सची प्रस्तुती करताना याच बाजारवर्गाला प्रामुख्याने लक्ष्य केले गेले असल्याचे स्पष्ट केले.

महानगरांमध्ये घरगुती एसीची मागणी ही स्थिरावली आहे, तर छोटया शहरात ती गती पकडत असल्याचे स्पष्ट दिसत असून, यामागे किमतीचा घटकही मोठी भूमिका बजावत आहे. शिवाय विजेच्या कमी-अधिक दाबात स्टॅबिलायझरविना तग धरून शीतकरण कार्यक्षमता आणि अन्य आधुनिक वैशिष्टयेही कारणीभूत आहेत. महानगरात विक्रीतील वृद्धीदर 20 टक्के तर तोच दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये 30 टक्‍के आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)