कौहलीला कौंटीत खेळू देणे हा आत्मघातकीपणा

बॉब विलीसचा इंग्लंडला इशारा
लंडन – भारतीय कर्णधार विराट कोहलीला इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेच्या तयारीसाठी इंग्लिश कौंटी स्पर्धेत खेळण्याची परवानगी देणे हा मूर्खपणा असल्याची टीका इंग्लंडचा माजी कर्णधार बॉब विलीसने केली आहे. इंग्लंडचा हा आत्मघातकीपणा असल्याचेही त्याने म्हटले आहे.

अन्य संघांविरुद्ध जबरदस्त कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीची इंग्लंडमधील सरासरी मात्र त्याच्या लौकिकाला साजेशी नाही. इतकेच नव्हे तर 2014च्या इंग्लंड दौऱ्यात विराट कोहली सपशेल अपयशी ठरला होता. या वेळच्या कसोटी मालिकेतही विराटला त्याच अवस्थेतून जायला लावण्याचे आवाहन विलीसने इंग्लंड संघाला केले आहे. कोहलीला कौंटीत परवानगी दिल्यामुळे इंग्लंड संघ घरच्या मैदानामुळे मिळणारा फायदा गमावणार असल्याचे सांगून विलीस म्हणाला की, कोणत्याही परदेशी खेळाडूंना कौंटीत परवानगी देणे मला मान्य नाही.

कोहली या वेळी सरे कौंटीकडून खेळणार असून याशिवाय चेतेश्‍वर पुजारा यॉर्कशायरकडून, तर ईशांत शर्मा ससेक्‍सकडून खेळत आहे. आपल्या संघाला फायदा मिळवून देण्याऐवजी विराट कोहलीला कौंटीत खेळण्याची परवानगी दिल्यामुळे इंग्लंडचा तोटाच होणार असल्याचे सांगून विलीस म्हणाला की, विराट या दौऱ्यात संपूर्ण अपयशी झालेला मला आवडेल. सरेच्या महिला क्रिकेट प्रमुख एबनी रेनफोर्ड-ब्रेन्ट यांनी मात्र विराट कोहलीमुळे कौंटीचा दर्जा उंचावणार असल्याचे सांगून विलीस यांची टीका फेटाळून लावली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)