कौशल्य विकासाला चालना मिळण्याची गरज- विनय प्रधान

अर्थसंकल्पात शिक्षण, मल्टीमीडिया, ई-लर्निंग प्रशिक्षणाला सवलती हव्या

नवी दिल्ली -जीएसटी क्रांतीनंतरचा हा पहिलाच केंद्रीय अर्थसंकल्प असून, या अर्थसंकल्पाकडून सर्वांच्या अपेक्षाही तितक्‍याच मोठ्या आहेत. कौशल्य भारत अभियानासाठी प्रेरक ठरतील तसेच, डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देतील, अशी धोरणे या अर्थसंकल्पाकडून आम्हाला अपेक्षित आहेत, असे इंडिया स्कीलसॉफ्टचे भारतातील व्यवस्थापक विनय प्रधान यांनी सांगितले.

-Ads-

ते म्हणाले की, सातत्याने होणारी तांत्रिक संशोधने पाहता, डिजिटली सुशिक्षित आणि वेगवान नव्या पिढीच्या मागण्या पूर्ण करणे हे एक मोठे आव्हान होत चालले आहे. ही डिजिटल क्रांती पेलण्यासाठी लोक तयार आहेत, याबाबत खात्री बाळगण्याच्या दृष्टीने तांत्रिक इन्फ्रास्ट्रक्‍चर आणि अर्थसंकल्पीय सहाय्य लोकांच्या कौशल्यांना जोडणे अत्यावश्‍यक आहे.
या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून, कौशल्य विकास अभियानात खासगी क्षेत्राचा जास्तीत जास्त सहभाग सरकारने करून घ्यायला हवा.

तसेच, शिक्षण व विकास क्षेत्रातील गुंतवणुकींवर करमाफी करावी. आपली कौशल्ये अधिक धारदार करण्यासाठी नोकरदार वर्गाला अधिक चालना देण्यासाठी, त्यांच्याकडून स्वयंअध्ययनासाठी केल्या जाणाऱ्या खर्चावरील करही सरकारने माफ करावा. इतकेच नव्हे, तर मल्टीमीडिया, ई-लर्निंग प्रशिक्षण पुरवठादारांनाही करमाफी मिळावी.

दरम्यान प्रत्येक ग्राहकासाठी एअर प्युरिफायर्स ही निकड झाली आहे. आपण दिवसांतला बराचसा म्हणजे साधारण 90 टक्के वेळ हा कार्यालये किंवा घरात घालवतो. घरातले किंवा कार्यालयातील हवा आरोग्यपूर्ण राखण्यासाठी एअर प्युरिफायर्स हा एक परिणामकारक उपाय आहे. प्रथम, हे प्युरिफायर्स ग्राहकांना अधिक किफायतशीर किंमतीत व सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी किमान काही महिन्यांसाठी यावरील जीएसटी सरकारने माफ करावा असे ब्ल्यूएअरचे संचालक गिरीश बापट यांनी सांगीतले.

ते म्हणाले की, ग्राहकांची रुची आणि विश्वास टिकवून ठेवण्यासाठी, सरकार व सार्वजनिक आरोग्य खात्याने एकत्र येऊन शहरातील अस्वच्छ ठिकाणांची पाहणी व आवश्‍यक त्या उपायांची अंमलबजावणी करायला हवी. यामुळे, उद्योगक्षेत्रात एकंदरीतच वाढ होऊ शकेल आणि ग्राहकांना एअर प्युरिफायर्स विकत घेण्यासाठी दिलासा मिळू शकेल. तसेच ज्या कॉर्पोरेट कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यवर्धनासाठी एअर प्युरिफायर्स भेट म्हणून द्यायचे असतील, त्यांच्यासाठी गाडीभाड्याप्रमाणे या खरेदीवरही काही प्रमाणात सवलत सरकारने जाहीर करायला हवी.

सध्याच्या हवामानातील प्रदुषणामुळे हवेचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला असून परिणामी, उत्पादकता कमी होण्यासोबतच अनेक आरोग्यसमस्याही बळावत चालल्या असल्याचे अनुमान आजवर विविध अभ्यासांती काढण्यात आले आहे. याचबरोबर, खोलीबंद हवा ही बाहेरील हवेच्या पाचपट प्रदूषित असू शकते हे सांगणारे अनेक अभ्यासही यापूर्वी करण्यात आले आहेत असे त्यानी सांगीतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)