“कौर’ नावामुळे सनी लिओनची बायोपिक वादात

बॉलीवूडमधील अभिनेत्री सनी लिओन हिच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वाद सुरु झाला आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वीच एक ट्रेलर रिलिज केला होता. मात्र, आता शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (एसजीपीसी) चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतला आहे.

सनी लिओनच्या या बायोपिकचे नाव “करणजीत कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओन’ असे आहे. कधी काळी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम केलेल्या सनी लिओनचे नाव “करणजीत कौर’ असे होते. त्यानंतर तिने धर्म परिवर्तन करत आपले नाव बदलेले होते. मात्र, चित्रपटाचे नाव “करणजीत कौर’ असेच ठेवण्यात आले आहे. याला एसजीपीसीचे प्रवक्ता दिलजीत सिंह बेदी यांनी आक्षेप नोंदवला आहे.

“करणजीत कौर’ असे या बायोपिकचे नाव ठेवणे शिखांच्या भावानांशी खेळण्याचा प्रकार असून “कौर’ शब्द वापरण्याचा काहीही हक्क धर्म बदलेल्या सनीला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सनी वा या बायोपिकच्या मेकर्सकडून अद्याप याबाबत कुठलाही खुलासा आलेला नाही.

“करणजीत कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओन’ हे सनीचे बायोपिक प्रत्यक्षात एक वेबसीरिज आहे. यात सनी लिओन स्वत:ची भूमिका साकारताना दिसणार आहे. आदित्य दत्त दिग्दर्शित करत असलेल्या या बायोपिकमध्ये 14 वर्षीय रसा सौजनी सनीच्या बालपणीची भूमिका वठवणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)