कौन बनेगा करोडपती 10 – अमिताभ बच्चन यांनी दहाव्या पर्वाची शूटिंग केली सुरू

अभिनेते अमिताभ बच्चन हे केवळ मोठ्या पडद्यावरीलच नाहीतर लहान पडद्यावरील देखील सुपरस्टार आहेत. अभिनेता अमिताभ बच्चन यांनी शनिवारी लोकप्रिय  टेलिव्हिजन कार्यक्रम  कौन बनेगा करोडपती (केबीसी) याच्या दहाव्या पर्वाची शूटिंग सुरू केली आहे. याची माहिती खुद्द अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून दिली आहे.

अमिताभ यांचे म्हणणे आहे की, ‘या कार्यक्रमाशी माझे जुने नाते राहिले आहे’. यादरम्यान 75 वर्षीय अमिताभ यांनी या कार्यक्रमाविषयी काही जुन्या क्षणांच्या आठवणी आपल्या ब्लाॅगमध्ये लिहिल्या आहेत. अमिताभ हे  2000 सालापासून या कार्यक्रमासोबत जोडले गेलेले आहेत.

त्यांनी लिहले आहे की, ‘केबीसी या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशीच्या शूटिंग दरम्यान मी घाबरलेला होतो. केबीसी या कार्यक्रमास भारतात 18 वर्षे झाले आहेत, आणि हे 10 वे पर्व आहे. ज्यामध्ये बहुतेक पर्वाशी मी जोडलेला गेलो आहे. पण हेच खरं आहे. तुम्ही दिलेले प्रेम आणि समर्थन याशिवाय हे शक्य नव्हते’. धन्यवाद.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)