कौटुंबिक न्यायालयात वकिलाला मारहाण

दी फॅमिली कोर्ट लॉर्यस असोसिएशनने सभा घेऊन केला निषेध

पुणे – कौटुंबिक न्यायालयात बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास एका वकिलाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी गुरुवारी न्यायालयात सभा घेऊन या प्रकाराचा निषेध केला.
ऍड. संदीप महाले यांना एका व्यक्तीने मारहाण केली. कौटुंबिक न्यायालयातील पहिल्या मजल्यावर हा प्रकार घडला. याप्रकरणी ऍड. महाले यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. वकिलाला न्यायालयाच्या आवारात मारहाण झाल्याच्या या प्रकाराचा वकिलांनी सभा घेऊन निषेध केला. यावेळी दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. गणेश कवडे, उपाध्यक्ष ऍड. प्रगती पाटील, ऍड. वैशाली चांदणे, ऍड. झाकीर मणियार, ऍड. आशिष पुरोहित, ऍड. सुनील कोटलीकर, ऍड. एकनाथ सुगावकर, ऍड. भरत मोरे, ऍड. निवेदिता कुंटे, ऍड. सुचित मुंदडा, ऍड. सुदाम मुरकुटे यांचासह मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते. यावेळी वकिलांनी कौटुंबिक न्यायालयातील सुरक्षेविषयक चिंता व्यक्त केली. सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची मागणी करण्यात आली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)