कौटुंबिक न्यायालयातील पार्किंगला मुहूर्त कधी ?

न्यायालयाचे उदघाटन होऊन सात महिने उलटले 


तरीही पार्किंग सुरूच नाही


वकील, पक्षकारांची होतेय गैरसोय

पुणे – कौटुंबिक न्यायालयाचे उदघाटन होऊन सात महिन्याचा कालावधी उलटून गेला. तरीही अद्याप येथील पार्किंग सुरू झालेले नाही. त्याचा परिणाम शिवाजीनगर न्यायालयातील पार्किंगवर होत आहे. कौटुंबिक न्यायालयात प्रॅक्‍टीस करणारे वकील, पक्षकार शिवाजीनगर न्यायालयात गाडी पार्क करतात. त्यामुळे तेथे वाहनांची गर्दी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर कौटुंबिक न्यायालयातील पार्किंग कधी सुरू होणार, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
शिवाजीनगर न्यायालयाच्या चार क्रमांकाच्या प्रवेशद्वारजवळ असलेल्या कौटुंबिक न्यायालयाच्या मालकीच्या असलेल्या राज्यातील पहिल्या इमारतीचे उदघाटन 12 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश डॉ. मंजुळा चेल्लूर याच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी पार्किंग, शिवाजीनगर-कौटुंबिक न्यायालयाला जोडणाऱ्या भुयारी मार्गाचे उदघाटन होणे अपेक्षित होते.

मात्र, तसे झाले नाही. नंतर काळात उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयात “पे अँड पार्किंग’ सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव दिला. मात्र, पुणे जिल्ह्यात कोणत्याही न्यायालयात पार्किंगसाठी शुल्क आकारण्यात येत नाही. त्यामुळे येथे पार्किंगसाठी शुल्क मोजण्यास वकिलांनी नकार दिला. त्याबाबत उच्च न्यायालयाला कळविण्यात आले. त्यानंतर पुणे बार असोसिएशननेही यामध्ये लक्ष घालून भुयारी मार्ग, पार्किंग सुरू करण्याची मागणी केली होती. दरम्यान जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भुयारी मार्ग सुरू झाला. प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या उपस्थितीत त्याचे उदघाटन झाले. त्यावेळी पार्किंग लवकर सुरू करण्याचे आश्‍वासन त्या कार्यक्रमात देण्यात आले होते. त्यालाही आता तीन महिने पूर्ण होत आले आहेत. अद्याप कौटुंबिक न्यायालयातील पार्किंग सुरू झालेले नाही. त्यामुळे वकील, पक्षकारांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर येथील पार्किंग कधी सुरू होणार, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

कौटुंबिक न्यायालयातील पार्किंग सुरू होणे आवश्‍यक आहे. पार्किंग सुरू होण्याबाबत कौटुंबिक, सत्र आणि उच्च न्यायालयातील समन्वय नाही. त्यामुळे अद्याप पार्किंग सुरू झालेले नाही. परिणामी वकील, पक्षकार आणि न्यायालयीन घटकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. येथील पार्किंग लवकरात लवकर सुरू करणे गरजेचे आहे.
ऍड. मिलिंद पवार
माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा बार असोसिएशन.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)