कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारी “निर्विघ्न साथ’

अत्यंत दुर्गम व डोंगराळ भाग असलेल्या टाकवे-वडेश्‍वर गटाच्या जिल्हा परिषद सदस्या शोभा सुदाम कदम कौटुंबिक व प्रशासकीय जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. आपल्या संस्कृतीतील सर्व सण-उत्सवासाठी तेवढ्याच उत्साहाने साजरे करतात.

गणेशोत्सवाबद्दल शोभा कदम म्हणतात की, माझ्या माहेरी व सासरी अनेक वर्षापासून, पिढ्यान्‌पिढ्या गणेशोत्सव सण साजरा केला जातो. ती परंपरा आम्ही आजही पुढे चालू ठेवलेली आहे. शाडूच्या मातीची मूर्ती, साध्या पद्धतीने सजावट व विद्युत रोषणाई करुन आम्ही प्रत्येक वर्षी गणेशोत्सव साजरा करतो.

गणपती विद्येची देवता असून, प्रत्येक कार्यात गणेशाच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात केली जाते. म्हणून गणरायाला सर्वश्रेष्ठ मानले जाते. गणेशोत्सवात पर्यावरणाला पूरक अशी शाडुच्या मातीची मूर्ती असावी व “इको फ्रेंडली’ गणेशोत्सव सण साजरा करावा. तसेच मोठमोठ्या आवाजाचे स्पीकर्स लावून ध्वनीप्रदूषण करू नये. डीजे विरहित, गुलाल विरहात पर्यावरणाला हानी पोहचणार नाही, असा सण साजरा करावा. निर्माल्य नदी, तलाव, विहीर यामध्ये न टाकता खड्‌डा खोदून त्यामध्ये टाकावे, असे आवाहन जनतेस या गणेशोत्सवाच्या शोभा कदम यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेचा टाकवे-वडेश्‍वर मतदार संघ हा ग्रामीण असून, डोंगराळ भागाने व्यापलेला आहे. भौगोलिक स्थिती व्यापक (मोठी) असून, गणेशोत्सव काळात माझ्या मतदार संघात बहुतेक गावांमधील गणेश मंडळांचे कार्यकर्ते गणपतीच्या आरतीला येण्यासाठी आग्रह धरतात. माझ्या घरी देखील गणपती असतो, मात्र मतदारसंघालाही मी घर मानून शक्‍य तितक्‍या मंडळांच्या आरतीला हजेरी लावते. माझ्या घरातील गणपतीची सकाळची आरती मला घेता येते; परंतु वेळ प्रसंगी सायंकाळची आरती मतदार संघातील मंडळांच्या आरती घ्यावी लागते. घरातील गणपतीबरोबर मंडळांच्या गणपतींची मनोभावे सेवा करण्याला प्राधान्यक्रम दिला जातो.

यंदाचा गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात आनंदात, शांततेत व निर्विघ्नपणे पार पडावा, तसेच गणेशोत्सव काळात भरपूर पाऊस पडून माझा बळीराजा सुखी व्हावा, ही गणराया चरणी प्रार्थना आहे.
– शोभा सुदाम कदम, सदस्या, जिल्हा परिषद पुणे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)