“कोहिनूर’चे वसंतलाल गांधी यांचे वृद्धापकाळाने निधन

नगर – नगरचे प्रसिध्द वस्त्रदालन “कोहिनूर’चे संचालक वसंतलाल कनकमल गांधी यांचे आज पहाटे वृध्दापकाळाने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगा प्रदीप गांधी, मुलगी जयश्री मोहनलाल मुनोत, नातू अश्‍विन गांधी, नात मधुर जैन, सून, नातसून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. गांधी यांचे मरणोत्तर नेत्रदान
करण्यात आले.
त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. माळीवाडा बसस्थानका समोरील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. ही अंत्ययात्रा कोहिनूर येथे आल्यानंतर तेथे वसंतलाल गांधी यांचे पार्थिव अर्धातास अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अमरधाम स्मशानभूमीत दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
वसंतलाल यांचे वडील कनकमल गांधी यांनी नगरच्या बाजारपेठेत 80 वर्षापूर्वी छोटेसे कापड दुकान सुरू केले होते. त्यानंतर वसंतलाल यांनी सचोटीच्या व्यवहारातून व्यवसाय वाढविला. कापड दुकानाला भव्य दालनाचे स्वरूप दिले. 30 वर्षापूर्वी त्यांनी काळाची पावले ओळखून कोहिनूर वस्त्रदालन उभारले. त्यावेळी ते मबुंई पुण्यातील वस्त्रदालनापेक्षाही भव्य होते. व्यावसायिक दूरदृष्टीतून त्यांनी आणलेल्या उत्तमोत्तम वस्त्रमालिका, सचोटी, ग्राहकांचा विश्‍वास हे त्यांच्या व्यवसायवृध्दीचे गमक होते. नगरमध्ये उभारण्यात आलेल्या आनंदऋषी रुग्णालयाच्या स्थापनेत वसंतलाल गांधी यांचा पुढाकार होता. सुरूवातीच्या काळात ते आनंदऋषी रूग्णालयाचे आधारस्तंभ होते. पाच- सहा वर्षे ते या कार्यात सक्रिय होते. कोहिनूर ट्रस्ट नावाने त्यांनी कौटुंबिक विश्‍वस्त संस्था स्थापन केली आहे. या संस्थेव्दारे ते गरजूंना आरोग्य व शिक्षणासाठी मदत करीत असत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)