कोहिनुर ग्रुपच्या ‘टीन्सल काउंटी’ गृहप्रकल्पाचा शुभारंभ 

(डावीकडून वेलवर्थ रिऍलिटीचे डायरेक्टर जयदीप धनंजय मोडक व कोहिनुर ग्रुप चे जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर  राजेश कृष्णकुमार गोयल)

पुणे : पुणेस्थित कोहिनुर ग्रुपच्या नाविन्यपुर्ण अशा ‘टीन्सल काउंटी’ या गृहप्रकल्पाचा हिंजेवाडी फेज ३ येथे शुभारंभ होत आहे.टीन्सल काउंटी गृहप्रकल्प म्हणजे योग्य दरामध्ये योग्य आकाराच्या सदनिका, ज्या आपल्या बजेट नुसार आहेत. या योजनेत १ BHK साठी ३३.५१लाख (सर्व करांसहित) व २ BHK साठी ४५.८२ लाख (सर्व करांसहित) दर निश्चित केला आहे. ही योजना मर्यादित काळासाठी असून यामध्ये मजल्यानुसार वाढणारे दर व “विशिष्ठ सदनिका” निवडीसाठी लागणारे शुल्क यामध्ये सूट मिळेल. हा एक वितरण सोहळा असून ज्या विविध सवलती देण्यात येत आहेत त्यामध्ये १००% GST ची सवलत सुद्धा आहे. या सदनिकाची रचना ग्राहकांच्या हितासाठी अतिशय सूक्ष्मपणे केलेली आहे जेणेकरून उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर होईल व कुठलीही जागा व्यर्थ जाणार नाही. हिंजेवाडी फेज ३ हे ठिकाण मुख्य शहराला विविध मार्गाने जोडलेले असल्याने ‘टीन्सल काउंटी’ या गृहप्रकल्पाची येथे जाणीवपुर्वक उभारणी करीत आहोत. एवढेच नव्हे तर शाळा, हॉस्पिटल, रेस्टोरंटस, हॉटेल्स हे देखील या गृहप्रकल्पाला लागुन असुन शॉपिंग मॉल व बँक काही पावलांवर आहेत. सुयोग्य ठिकाणच्या फायद्यासहित ‘टीन्सल काउंटी’  ग्राहकांना वैविध्यपूर्ण व नानाविविघ सुखसोईचे दालन खुले करत आहे ज्यामध्ये अँफीथियेटर, स्विमिंगपुल, मैदानी खेळांसाठी पुरेपुर जागा, सोलर, क्लब हाऊस व बरेच काही समाविष्ट आहे. बांधकामाचा उत्तम दर्जा व निर्धारित वेळेमध्ये हस्तांतरण असा कोहिनुर ग्रुपचा नावलौकिक आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना पाहण्यासाठी नमुना (Sample) सदनिका उपलब्ध असुन गृह नोंदणीला (बुकिंग) ला सुरुवातही झाली आहे. तसेच प्रस्तुतचा प्रकल्प हा रेरा (RERA ) अन्वये नोंदणीकृत गृहप्रकल्प आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)