कोहली सर्वाधिक शतकांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर

कोलंबो – भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना कोलंबोतील एस. प्रेमदासा स्टेडियमवर सुरवात झाली आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने 76 चेंडूत शतक ठोकले आहे. कोहलीचं हे वन डेतील 29 वे शतक ठरले आहे. या अगोदर केवळ कोहलीने 38 चेंडूत 50 धावा केल्या होत्या. कोहलीने 76 चेंडूत 14 चौकार आणि 1 षटकार ठोकून शतक पूर्ण केलं.

वन डेमध्ये सर्वाधिक शतकांच्या यादीत कोहली आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या पुढे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंग (30) आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (49) हे दोनच खेळाडू आता पुढे आहेत. कोहलीने या शतकासह श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याला (28) मागे टाकलं. दरम्यान, कोहलीपाठोपाठ सलामीवीर रोहित शर्माही शतकाकडे कूच करत आहे. कोहली-रोहित शर्माने दुसऱ्या विकेटसाठी नाबाद 200 धावांची भागीदारी रचली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)