कोहली, मीराबाई चानू यांनै “खेलरत्न’ जाहीर

येत्या 25 रोजी पुरस्कार वितरण

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहली आणि विश्‍वविजेती महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना “राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ देण्यात आल्याचे आज अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले. येत्या 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते क्रीडा पुरस्कारांचे वितरण होणार आहे. एकूण 20 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाले असून आठ प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार व चौघांना ध्यानचंद पुरस्कार जाहीर झाले आहेत.

-Ads-

पुरस्कार विजेत्या खेळाडूंची यादी-
खेलरत्न पुरस्कार- 1) विराट कोहली व मीराबाई चानू, अर्जुन पुरस्कार- 1) नीरज चोप्रा, 2) हिमा दास, 3) जिन्सन जॉन्सन, 4) स्मृती मंधाना, 5) सुमित, 6) मनप्रीत सिंग, 7) सविता पुनिया, 8) रोहन बोपण्णा, 9) सिक्‍की रेड्डी, 10) शुभंकर शर्मा, 11) सतीश कुमार, 12) रवी राठोड, 13) राही सरनोबत, 14) अंकुर मित्तल, 15) श्रेयसी सिंग, 16) मनिका बात्रा,17) जी. साथियन, 18) पूजा कादियन, 19) अंकुर धामा व 20) मनोज सरकार, र्दोणाचार्य पुरस्कार- सीए कुटाप्पा, विजय शर्मा, श्रीनिवास राव, सुखदेव सिंग पन्नू, क्‍लॅरेन्स लोबो, तारक सिन्हा, जीवनकुमार शर्मा व व्हीआर बीडू, ध्यानचंद पुरस्कार- सत्यदेव प्रसाद, भारतकुमार छेत्री, बॉबी ऍलॉयसियस व दादू चौगुले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)