पुणे – आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्रॅव्हल गियर्सकरीता प्रसिद्ध असलेल्या अमेरिकन टूरिस्टरने चॅम्पियन फुटबॉलर क्रिस्टियानो  रोनाल्डो आणि मास्टरब्लास्टर क्रिकेटर विराट कोहली यांना नुकतेच आपले ब्रॅंड ऍम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे. जय कृष्णन सीईओ, सॅमसोनाईट साऊथ एशिया यांनी सांगितले की, आमच्या ब्रॅंडप्रति प्रेम दर्शवणाऱ्या या दोन महान व्यक्तींमुळे अमेरिकन टुरिस्ट भरपूर यश संपादन करेल. विराट कोहली म्हणाला की, एक फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर असल्यामुळे अमेरिकन टुरिस्टरच्या जाहिरातीत दिलेला संदेश हा अतिशय उत्तम आहे. प्रत्येक प्रवासी प्रवासात आपल्या लगेजची काळजी घेतो आणि आपले लगेज आपल्या जवळ ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. अमेरिकन टुरिस्टर ने हा विचार आपल्या जाहिरातीतून उत्तमरीत्या मांडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)