कोहलीवरील जादा कार्यभार, अन्‌ धोनीला पर्याय? ; निवड समितीसमोर खडतर आव्हान

एकदिवसीय आणि टी-20 मालिका 

हैदराबाद: कर्णधार विराट कोहलीवरील जादा कार्यभार कमी करण्यासाठी उपाययोजना आणि अनुभवी महेंद्रसिंग धोनीचा फलंदाजीतील घसरता फॉर्म पाहता त्याला पर्याय शोधण्याची निकड या दोन प्रमुख समस्यांमुळे वेस्ट इंडीजविरुद्ध आगामी एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेट मालिकांसाठी संघनिवड करण्याकरिता उद्या होणाऱ्या बैठकीत राष्ट्रीय निवड समितीसमोर खडतर आव्हान असेल.

-Ads-

 

पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका या दोन्ही संपूर्ण मालिकांसाठी एकाच वेळी संघनिवड करण्यात येणार किंवा कसे याबद्दल अद्याप स्पष्टता नसली, तरी कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा तीनही प्रकारांमध्ये सातत्याने खेळत असल्यामुळे कर्णधार विराट कोहलीवर पडणारा ताण कमी करणे हे निवड समितीसमोरील महत्त्वाचे लक्ष्य राहील. कोहलीने अद्याप तशी मागणी केलेली नसली, तरी हा प्रश्‍न निवड समितीला हाताळावा लागणार आहे. आशिया चषक स्पर्धेतील रोहित शर्माच्या यशामुळे निवड समितीकडे कोहलीला विश्रांती देण्यासाटी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. तरीही आशिया चषक स्पर्धेच्या धर्तीवर संपूर्ण मालिकेतून कोहलीला विश्रांती देण्यात येण्याची शक्‍यता अगदीच कमी आहे.

 

तसेच भारताला दोन विश्‍वचषक जिंकून देणारा महेंद्रसिंग धोनी आजही देशातील सर्वोत्तम यष्टीरक्षक असला, तरी तो सध्या फलंदाजीच्या “बॅड पॅच’मधून जात असल्याने वेळ पडल्यास त्याला पर्याय म्हणून निवड समिती काही व्यवस्था करणार की नाही हीसुद्धा उत्सुकतेची बाब आहे. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील चमकदार कामगिरीच्या जोरावर अंबाती रायुडू संघातील स्थान राखण्याचीच शक्‍यता आहे. तसेच आशिया चषक विजेता कर्णधार रोहित शर्मा आणि त्याचा साथीदार शिखर धवन यांच्याकडेच सलामीची जबाबदारी देण्यात येणार हे स्पष्ट आहे. तिसऱ्या क्रमांकावरील विराट कोहलीनंतर चौथ्या क्रमांकावर रायुडूलाच संधी मिळण्याची शक्‍यता दिसते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
4 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)