कोहलीचे शतक पूर्ण, भारत ५ बाद २८६ 

नॉटिंघम: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या कसोटीमध्ये भारताकडून शतक झळकावले आहे. संपूर्ण कसोटी मालिकेमध्ये कोहली जबरदस्त कामगिरी करत असून कोहलीने तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावामध्ये देखील ९७ धावा ठोकल्या होत्या. कोहलीने आज आपल्या डावामध्ये १० चौकारांसह १९७ चेंडूंमध्ये १०३ धावा करून तो बाद झाला.
तत्पूर्वी भारतातर्फे आज चेतेश्वर पुजाराने देखील चांगला खेळ करत अर्धशतक पूर्ण केले. भारताने यजमान इंग्लंड संघावर ४५४ धावांची पकड घेतली असल्याने भारताचे पारडे या सामन्यामध्ये जड झाले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)