कोस्टा क्रुझचे मुंबईत स्वागत; मुंबई-मालदीव प्रवास कोचीनमार्गे पूर्ण करणार

मुंबई, दि. ७ : युरोपमधील नामांकित कोस्टा क्रुझ कंपनी भारतात तिसऱ्यांदा कोस्टा रिवेरासह आपला नौकाविहार सुरू करणार आहे. या जल प्रवासाचा आज मुंबईच्या आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनसवर शुभारंभ करण्यात आले. यावेळी या क्रुझचे स्वागत करण्यात आले.

यावेळी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे,इटलीच्या राजदूत स्टिफानिया कोस्टान्जा, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया,परिवहन व बंदरे विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोस्टा निओ रिवेरा हे जहाज मुंबई ते मालदीवपर्यंतचा प्रवास कोचीन मार्गे पूर्ण करणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. हा नौकाविहार ८ डिसेंबर २०१८ ते १६ मार्च २०१९ दरम्यान असणार आहे. हे जहाज प्रशस्त आणि यातील पायाभूत सुविधा उत्तम असल्यामुळे येथे मोठे कार्यक्रम सहज पार पडू शकतात. येथील क्लासिक क्रुझ मध्ये ६५४ केबिन आहेत त्यामध्ये पर्यटकांसाठी समुद्र दृश्य,खाजगी बाल्कनी यांसारख्या सुविधा आहेत. येथील १ हजार ७०० अतिथींच्या सेवेसाठी सुमारे ६७० चालक दल उपलब्ध आहेत. येथे कसिनो, थिएटर, डिस्को बॉलरूम, ग्रँड बार, मॅजिक शो यांसह अशा अनेक मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध आहेत. हे क्रूझ गेले तीन वर्षे नौका विहार करणाऱ्या अतिथींना दर्जेदार सेवा प्रदान करत आहेत.

कोस्टा क्रुझमुळे परदेशी पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होण्यास मोठी मदत होणार आहे. मुंबईत आलेल्या या क्रुझचे आज पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)