कोसावोमध्ये संसदेत विरोधकांनी फोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या

कोसावो – संसदेच्या सभागृहामध्ये विरोधकांनी गोंधळ घालणं ही सामान्य बाब आहे मात्र. संसद भवनातील मतदान रोखण्यासाठी विरोधकांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्याची विचित्र घटना कोसावोमध्ये पाहायला मिळाली. कोसावो येथील संसदेत बुधवारी ही घटना घडल्याचं वृत्त आहे.

कोसावो आणि मोंटेनेगरो या दोन्ही देशांमध्ये सीमाप्रश्नावरून वाद आहे. बुधवारी कोसावोच्या संसदेत मोंटेनेगरोसोबत झालेल्या सीमा करारावर मतदान होणार होतं. पण अचानक विरोधी खासदारांनी सीटच्या खालून अश्रूधुराच्या नळकांड्या काढल्या आणि सत्ताधा-यांच्या दिशेने भिरकावल्या. त्यामुळे संसदेत मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला, खासदार तोंडावर रूमाल ठेवून पळताना दिसले. संसदेत सर्वत्र धूर दिसत होता. त्यानंतर अखेर संसदेचं कामकाज स्थगित करण्यात आलं.मोंटेनेगरो सोबत झालेल्या सीमा करारामुळे कोसावोला 8200 हेक्टर जमिनीचं नुकसान होतंय असा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळेच मतदानाला त्यांचा विरोध होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)