कोसळलेल्या इमारतींखाली अडकेल्यांना शोधण्यासाठी खास उपकरण

नवी दिल्ली – कोसळलेल्या इमारतींखाली अडकलेल्यांना शोधण्यासाठी एका खास उपकरणाचा शोध लावण्यात आला आहे. हे उपकरण जिवंतपणाची अगदी अस्पष्ट लक्षणेही ओळखू शकते. भूकंपामुळे वा अन्य कारणांनी इमारती कोसळल्यानंतर पहिले काम असते ते त्याखाली अडकून पडलेल्यांना वाचवणे. मात्र इमारतींच्या ढिगाऱ्यांमधून माणसाना त्वरित शोधणे हे एक मोठे आव्हान असते, जसजसा वेळ जातो, तसतसे इमारतीच्या अवशेषांखाली अडकलेल्यांना जिवंत वाचवण्याची शक्‍यता कमी कमी होत जाते.

त्या दृष्टीने स्वित्झर्लॅंडच्या ईटीएच ज्यूरिख आणि ऑस्ट्रियातील इन्सब्रक विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी मिळून सेन्सर तयार केला आहे. वजनाला हलका आणि ड्रोनच्या साह्याने कोठेही सहजपणे नेता येण्यासारखा हा सेन्सर जिवंतपणाची अगदी सूक्ष्म लक्षणेही पकडू शकतो. त्यामुळे या सेन्सरच्या साह्याने इमारतीच्या अवशेषांखाली दबल्या गेलेल्यांना लवकर जिवंत बाहेर काढणे शक्‍य होणार आहे.

सध्या या कामासाठी प्रशिक्षित श्‍वानपथक आणि ध्वनिवर आधारित उपकरणांचा वापर केला जातो. मात्र अशा प्रशिक्षित श्‍वानपथकांची संख्या फारच मर्यादित असून ती वेळेवर उपलब्ध होतातच असे नाही. त्यामुळे हे उपकरण इमारतींच्या अवशेषाखाली अडकलल्यांचे मौल्यवान प्राण वाचवण्यासाठी अतिशय उपयुक्त होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)