कोविंद विलक्षण राष्ट्रपती ठरतील – मोदींचा विश्‍वास

नवी दिल्ली, दि. 19- राम नाथ कोविंद हे विलक्षण राष्ट्रपती ठरतील. देशातील गरीब, दीन आणि उपेक्षित समाजाचा आवाज म्हणून ते यापुढेही कार्यरत रहातील, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्‍त केला आहे.

भाजप संसदीय मंडळाने बिहारचे राज्यपाल राम नाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवड जाहीर केल्यानंतर मोदी यांनी हा विश्‍वास व्यक्‍त केला. कायद्याच्या क्षेत्रातील सुविख्यात पार्श्‍वभुमीतील कोविंद यांचे ज्ञान आणि राज्यघटनेची उत्तम समज देशाला नक्कीच फायदेशीर ठरेल, असेही मोदी म्हणाले.

शेतकरी कुटुंबातील कोविंद हे नम्र स्वभावाचे असून त्यांनी सार्वजनिक सेवेसाठी आपले आयुष्य वाहिले असून गरिब, उपेक्षितांसाठी सातत्याने काम केले आहे, असेही मोदींनी ट्विटरवर म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)