शिवनेरी- आदिवासी विचारमंच महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आदिवासी शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी जुन्नर येथील शिवाजी महाराज पुतळा ते शिवनेरीपर्यत पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर शिवनेरीवर असलेल्या कोळी-महादेव चबुतऱ्याला (काळा चबुतरा) अभिवादन करण्यात आले. यावेळी जय बिरसा जय आदिवासीच्या जय घोषणानी अवघा शिवनेरी परिसर दुमदुमला होता.
याविषयी मंचाचे सल्लागार राजाराम बेंडकोळी यांनी सांगितले की, आदिवासी विचार मंच महाराष्ट्र व जुन्नर या संघटनेच्या वतीने आयोजित पदयात्रेत जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, इगतपुरी, अकोले, जव्हार शहापूर, संगमनेर, विक्रमगड, कल्याण, ठाणे, पुणे, नगर, सिन्नर, मुरबाड, मुंबई, नागपूर आदी भागातील आदिवासी बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते. कोळी-महादेव व ठाकर समाजातील लोकांनी मातृभूमीसाठी बलिदान दिले. सर्वस्वाचा त्याग केला. मात्र, इतिहासाने आदिवासी विरांच्या बलिदानाची दखल घेतली नाही. तसेच आदिवासींच्या पराक्रमाचा इतिहास सांगितला नाही. यावेळी 1800 आदिवासी बांधव शिवनेरी किल्ल्यावर उपस्थित होते. कार्यक्रमात आदिवासी एकता परिषदेचे संस्थापक डोंगर बागुल, राष्ट्रपती पदक विजेते ठकाबाबा गांगड, शंकर आसवले, नरेश मुकणे, सतीश पेदाम, योजना वाजे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)