कोळावडेत 21 लाभार्थ्यांना गॅसजोड

पिरंगुट-कोळावडे (ता. मुळशी) येथील 21 लाभार्थ्यांना गॅस कनेक्‍शनचे वाटप शिवतेज गॅस एजन्सीमार्फत करण्यात आले. केंद्र सरकारकडून गोरगरिबांना देण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत याचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपसरपंच स्वाती येनपुरे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश येनपुरे, माजी पोलिस पाटील मारुती जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब उभे, अनिल उभे, ज्ञानोबा ऊभे, शंकर शेळके, किरण शेळके आदी मान्यवर तसेच लाभार्थी उपस्थित होते. अनेक गावे ही डोंगरी भागात असल्याने लोक इंधन म्हणून जंगलातील लाकुडफाटीचाच वापर करतात. लाकडाच्या धुरापासून डोळ्यांनांही त्रास होतो, तसेच फुफ्फुसाचे आजार होत असतात. हे आजार टाळण्यासाठी व डोळ्यातील अश्रु पुसण्यासाठी सरकारची ही योजना लाभदायक असल्याचे मत उपसरपंच स्वाती येनपुरे यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)