कोळमाथा येथे अपघातात दुचाकीस्वारचा मृत्यू

file photo

ओतूर- नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील ओतूर (ता. जुन्नर) जवळील कोळमाथा येथे
चारचाकी आणि दुचाकीची धडक होऊन यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 23) सायंकाळी घडली.
या अपघातात दिगंबर देवराम मधे (वय 41, रा. बदगी बेलापूर, अहमदनगर, सध्या रा. ओझर ता. जुन्नर,पुणे) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या अपघाताबाबत ओतूर पोलीस ठाण्याचे अंमलदार पी. डी. मोहरे यांनी सांगितले की, नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील कल्याणकडून आळेफाट्याकडे जाणारी चारचाकी (एमएच 17 बीडी 3035) आणि नगरकडून कल्याणकडे जाणारी दुचाकी (एमएच 04 बीएल 6919) यांच्यात रविवारी (दि. 23) सायंकाळी कोळमाथा येथे धडक होऊन दुचाकीस्वार दिगंबर मधे जागीचा मृत्यू झाला. या अपघाताचा पुढील तपास ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार पी. डी. मोहरे करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)