कोळगावथडीच्या घराघरात नळाद्वारे पाणी पोहचविणारच

कोपरगाव – तालुक्‍यातील कोळगावथडी परिसरातील महिलांच्या डोईवरचा हंडा उतरविणार आहे. यात कितीही अडथळे आले तरी त्यांना थेट घरात नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळवून देणारच, असा निर्धार आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्‍त केला.

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत कोळगावथडी नळपाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावातील अडथळे दूर करून 60 लाख 5 हजार 559 रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास विषेश मंजुरी घेवून आमदार कोल्हे यांनी या योजनेचे भूमिपूजन रविवारी केले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी संजीवनीचे उपाध्यक्ष सोपानराव पानगव्हाणे, संचालक विलासराव वाबळे, राजेंद्र कोळपे, मोहनराव वाबळे, माहेगाव देशमुखचे सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, एल. डी. पानगव्हाणे, सीताराम पानगव्हाणे, राजेंद्र देशमुख, वसंतराव लकडे, पंचायत समितीचे घुले, वाघ, माजी सरपंच शिवाजी निंबाळकर, काशिनाथ वाकचौरे, नानासाहेब ढोमसे, भिकचंद लुटे, शामराव मेहेरखांब, प्रशांत वाबळे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सुरेगाव, माहेगाव देशमुख, कोळपेवाडी, शहाजापूर, वेळापूर पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

आ. कोल्हे म्हणाल्या की, तालुक्‍यातील कोळगावथडी आणि उक्कडगावच्या पाणीपुरवठा योजना रखडल्या होत्या. त्यातील त्रृटींची पूर्तता करून हा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण स्वतः भेटून त्याची अंतिम मंजुरी मिळविली. महिलांना पाण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो याची कल्पना आपल्याला आहे. त्यांचे हे दुःख कमी करण्यासाठीच एक महिला लोकप्रतिनिधी या नात्याने आपण साडेतीन वर्षात मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करून अनेक विकास योजनांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी मिळविला आहे. कोळगावथडीवासीयांनी माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्याकडे अनेक वेळा शिष्टमंडळे घेवून पिण्याच्या पाणी योजनेच्या वेदना मांडल्या आहेत. महिलांच्या डोईवरचा हंडा दूर झाला पाहिजे. यासाठीच 52 लाख 64 हजार रूपये खर्चाची निविदा काढून हे काम प्राधान्याने मार्गी लागावे ही तळमळ मनात होती. त्यामुळेच हे भूमिपूजन केल्याचे त्या म्हणाल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)