कोळकी परिसरात ढोल, ताशांच्या गजरात बाप्पांचे आगमन

कोळकी ः चिमुकल्यांच्या घरी लाडक्‍या बाप्पाचे आगमन.

कोळकी, दि.13 (वार्ताहर) – कोळकी व परिसरात विघ्नहर्त्या गणरायाचे सार्वजनिक गणेश मंडळांनी वाजत-गाजत व ढोल-ताशांच्या गजरात व धुमधडाक्‍यात बाप्पांच्या मूर्ती प्रतिष्ठापना केली. सर्वत्र सर्वत्र गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात सार्वजनिक मंडळांसह घरोघरी लाडक्‍या बाप्पांचे आगमन झाले.
विघ्नहर्त्यांच्या स्वागतासाठी जनजीवन कालपासूनच आतुरले होते. बाप्पांच्या आगमनामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून गणेशभक्तांच्या आनंदाला भरते आले आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
बाप्पांच्या भक्तीचा महिमा सांगणाऱ्या या उत्सवामुळे वातावरण बाप्पामय झाले. विविध गणेश मंडळांतील मूर्तींच्या पारंपरिक वाद्ये व ढोल ताशांच्या गजरात, फटाक्‍यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणुका काढल्या. मूर्तीच्या मार्गक्रमणामध्ये महागणपतीवर ठिकठिकाणी गणेशभक्तांकडून फुलांचा वर्षाव करुन पूजन करण्यात येत होते. तसेच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
दरम्यान, विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांबरोबरच घरोघरी अबालवृद्धांनी जय्यत तयारी केली होती. बाप्पांच्या स्वागताच्या धांदलीने वातावरण गणेशमय झाले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडप सजावटीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. काही मंडळांचे कार्यकर्ते सजावटीच्या कामात मग्न असल्याचे चित्र दिसत होते. शहर व परिसरात ठिकठिकाणी मंडळांनी आकर्षक कमानी उभारून विद्युत रोषणाईही केली आहे. मंडळांनी देखावे व सजावट करण्यास सुरूवात केली आहे. पुढील अकरा दिवस उत्सवाचे असल्याने वातावरणाचा नूर पालटायला सुरूवात झाली असून बाप्पांच्या आगमनामुळे संपूर्ण परिसर बाप्पामय झाला आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)