कोल्हेवाडी फाटा येथे आजपासून क्रिकेट स्पर्धा

संगमनेर – तालुक्‍यातील कोल्हेवाडी फाटा येथे 30 जानेवारीपासून आमदार चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे.
सकाळी 10 वाजता आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, कांचन थोरात, इंद्रजित थोरात, रणजितसिंह देशमुख, सत्यजित तांबे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन होणार आहे. स्पर्धेचे पहिले बक्षीस 1 लाख 11 हजार 111 रुपये व चषक देण्यात येईल. दुसरे बक्षीस 61 हजार 111 रुपये व चषक, तिसरे बक्षीस 41 हजार 111 रुपये व चषक, चौथे बक्षीस 21 हजार 111 रुपये व चषक देण्यात येणार आहे. याशिवाय वैयक्‍तिक स्वरूपात 31 हजार 111 रुपये, 21 हजार 11 रुपये, 15 हजार 111 रुपये, 11 हजार 111 रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धा यशस्वीतेसाठी सिध्दार्थ थोरात, संतोष शेरमाळे, प्रवीण थोरात, पांडुरंग खेमनर, अली तांबोळी , सनी अभंग, अनिल गोर्डे, शुभम गायकवाड, चेतन मेने, बाबर शेख, प्रसाद थोरात, निखिल थोरात प्रयत्न करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)