कोल्हेवस्ती -मांजरवडी रस्त्याची दुरवस्था

खोडद-पुणे -नाशिक महामार्ग ते मांजरवाडी या कोल्हेवस्ती मार्गे जाणाऱ्या रस्त्याला मोठया प्रमाणात खड्डे पाडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
कृषि उत्पन्न बाजार समिति नारायणगाव येथे शेतमाल घेऊन येणारे शेतकरी, व्यापारी व नारायणगावच्या पूर्वेकडील गावातील नागरिक यांना महत्त्वाच्या ठरणाऱ्या या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मारुती काळे यांच्या विकास निधीतून 10 लाख रुपये मंजूर करून जुन्नर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. संजय काळे, आमदार दत्ता भरणे, वारुळवडीचे उपसरपंच जंगल कोल्हे, उद्योजक संजय वारुळे, ग्रामपंचायत सदस्य विपुल फुलसुंदर, जालिंदर कोल्हे, दिलीप कोल्हे यांच्या उपस्थितीत या रस्त्याचे उद्‌घाटन करण्यात आले होते. या रस्त्याचे मजबुतीकरण, खडीकरण करून 6 वर्षांपूर्वी रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. तेव्हापासून या रस्त्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य विपुल फुलसुंदर. राजेश मेहेर, जालिंदर कोल्हे, जी. प सदस्य माऊली खंडागळे व मांजरवाडी, रांजणी, वळतचे शेकडो वाहन चालक, नागरिक करत आहेत.

  • …अन्‌ या रस्त्याची चाळण झाली
    हा रस्ता नारायणगाव उपबाजारच्या मागील बाजूस असल्याने तो व्यापारी व शेतकऱ्यांना अत्यंत उपयोगी ठरत आहे. टोमॅटो हंगामात बाजार समितीमध्ये हजारो छोटी मोठी वाहने माल घेऊन येत असतात. त्यामुळे पोलीस ठाणे चौकात मोठ्या संख्येने वाहनांची वाहतूक कोंडी होत असते. यावर पर्याय म्हणून बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी कोल्हे वस्तीजवळील पर्यायी मार्ग सुचविला. तो माजी जि. प. सदस्य मारुती काळे यांच्या विकास निधीतून मंजूर करून घेतला. त्यामुळे नारायणगावच्या पूर्वेकडील असणाऱ्या मांजरवडी, नागापूर, वळती, रांजणी, पारगाव व इतर गावचा वाहतुकीचा प्रश्न सुटला खरा; परंतु या रस्त्यावरून बाह्यवळण (बायपास) रस्त्याच्या कामासाठी क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात दगड माती वाहून नेणाऱ्या मोठमोठ्या ट्रक दिवसरात्र पळत होत्या. त्यामुळे रस्त्याला प्रचंड खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)