कोल्हार येथे स्वामी समर्थ पालखीचे स्वागत

कोल्हार, दि. 18 (वार्ताहर)- राहाता तालुक्‍यातील कोल्हार भगवतीपूर येथे श्री स्वामी समर्थ महाराज पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले.
अक्‍कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे संगमनेरहून कोल्हारमध्ये आगमन होताच जोरदार स्वागत करण्यत आले. या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महाराजाच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी रीघ लागली होती. पालखीची मिरवणूक गावातून भगवती मंदिरात आल्यानंतर आरती करण्यात आली. गेल्या 20 वर्षांपासून स्व. चंद्रकांत सोमवंशी परिवार हे स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी आहेत. त्यांची परंपरा त्यांच्या तरुण पिढीनेही कायम ठेवली आहे. सोमवंशी कुटुंब कोल्हार भगवतीपूर येथील रहिवासी असून व्यवसायानिमित्त पुणे येथे स्थायिक असले तरी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी सोमवंशी कुटुंब आवर्जून उपस्थित राहते.
या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने त्यांच्या वतीने तमाम भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. यावेळी नितीन सोमवंशी, गणेश सोमवंशी, राजकुमार सोमवंशी, नीलकंठ सोमवंशी, आदींनी परिक्रम पुरोहित, संजय कुलकर्णी, अन्नछत्र मंडळ अक्‍क्‍लकोट पालखीचे स्वागत केले. यावेळी भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)