कोल्हार घोटी महामार्गावर तीन फुटाचा खड्डा

वाहतूकीला धोका निर्माण होण्याची शक्‍यता
संगमनेर – कोल्हार घोटी राज्य महामार्गावरील कसारादुमाला शिवारात मालपाणीच्या कंपनीजवळ एअर टेल कंपनीच्या केबल टाकण्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने सुरूंगस्फोट केल्यामुळे परिसरातील शेतीला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटून राज्य मार्गावर साधारण 3 फुटाचा खड्डा पडल्याने वाहतुकीला धोका निर्माण होण्याची दाट शक्‍यता आहे.
कोल्हार घोटी मार्गावर संगमनेर ते अकोले अशी एअर टेल कंपनीच्या वतीने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे.त्यासाठी सुरूंगस्फोट करण्यात येत आहे.त्या बोअरवेलच्या सुरूंगस्फोटामुळे नदीवरून शेतीसाठी आणलेल्या पाईपलाईनची सायपन मालपणी कंपनी जवळ शनिवारी मध्यरात्री जमिनीत फुटली असल्यामुळे संगमनेर चिखली रस्त्यावर साधारण तीन फूट खोल खड्डा पडला आहे. त्याचे पाणी रस्त्यावर आल्याने चिखल झाला आहे. वेळीच ही बाब पाईपलाईन असणाऱ्या शेतकऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने त्या पाईपलाईनवरील विद्युत मोटार बंद केल्यामुळे पाणी वाया गेले नाही.
कोल्हार घोटी राज्यमार्गाचे सार्वजनिक बांधकाम विभागाने संगमनेर ते चिखलीपर्यंत पक्‍के डांबरीकरण केलेले आहे. त्याच मार्गावरील संगमनेर ते चिखली या रस्त्यावर एअर टेल कंपनीने केलेल्या सुरूंगस्फोटामुळे साधरण 3 फुट खोल खड्डा पडला आहे. हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असल्यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. या खड्यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे संबंधित कंपनीने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने हा खड्डा तात्काळ बुजववा नाही, तर एखादी विचित्र घटना घडू शकते. याची संबंधित विभागाने दक्षता घ्यावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)