कोल्हार खुर्द येथे पंडिता रमाबाई यांची जयंती उत्साहात 

कोल्हार खुर्द – राहुरी तालुक्‍यतील कोल्हार खुर्द येथे पंडिता रमाबाई यांची 160 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्यावतीने पंडित रमाबाई यांच्या प्रतीमेला पुष्पहार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भोसले यांच्या मातोश्री कमलबाई विश्‍वास भोसले यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक फ्रान्सिस भोसले गुरुजी यांनी पुष्प अर्पण केले. विकास परिषदेचे जिल्हा सेक्रेटरी प्रकाश लोखंडे, राहाता तालुकाध्यक्ष योगेश भालेराव, तालुका सल्लागार बाळासाहेब भोसले, वसंत भोसले, प्रकाश चिखले, भाऊसाहेब भोसले, शांतवन भोसले, थॉमस भोसले, संत फ्रान्सिस झेवियर चर्च कमिटीचे अध्यक्ष विनायक भोसले, सुधीर भोसले, आकाश भोसले, शिवाजी लोखंडे, अमोल माने, अभिजीत डांगे, विश्‍वास भोसले, सुधाकर भोसले, शिरीष भोसले, आशीष भोसले, विशाल लोखंडे, मंगल भोसले, हर्षदा भोसले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे राज्य संघटक अंतोन भाऊ भोसले यांनी केले. सुधीर भोसले यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)