कोल्हार खुर्दमध्ये रेशन लाभधारकांची धावपळ

कोल्हार खुर्द – आधारकार्ड बायोमेट्रीक यंत्राशी लिंक न झाल्याने राहुरी तालुक्‍यातील कोल्हार खुर्द येथेकाही रेशन लाभधारकांची धावपळ उडाली. या महिन्यापासून येथील स्वस्त धान्यदुकानात सर्व रेशनधारकांना बायोमेट्रीक पद्धतीने रेशन वाटप करण्यात येत आहे. ज्या लाभधारकांचे आधार कार्ड लिंक झाले नाही त्यांना या महिन्याच्या रेशनवर पाणी सोडावेलागते की काय अशी चिंता सतावत आहे.

सर्व रेशनधारक आधार कार्डाशी संलग्न करण्यात आलेआहेत. त्याप्रमाणेबुधवारी कोल्हार खुर्द येथे बायोमेट्रीक पद्धतीने स्वस्त धान्य दुकानात रेशन देणेसुरु केले. या महिन्याचे स्वस्तधान्य आपल्याला एक महिन्यात कधीही मिळणार असल्याने ग्रामस्थ खुश होते. परंतु काही रेशनधारकांचेआधारकार्डबायोमेट्रीक यंत्राशी लिंकींग झाले नाही. यामुळे त्यांचा गोंधळ उडाला. ज्यांचे आधार कार्ड तात्पुरत्या स्वरुपात बंद आहेत त्यांची मात्र या प्रणालीमुळेचांगलीच धावपळ झाली. या प्रणालीबाबत कोल्हार खुर्दमध्ये एकीकडे स्वागत तर दुसरीकडे नाराजी दिसली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)